243 मुक्तिदाता प्रभू

मराठी

243 मुक्तिदाता प्रभू अहो पापाचे बंदीवान, किती हो झाला आशावान ! तुम्हांला कृपा दावूनि ख्रिस्ताने दिली खंडणी ... 1 तो आला मुक्ती द्यावया, व त्राणा गाजवावया; तो दु:खितांला शांतवी, आस न ज्यां त्यां हर्षवि ... 2 कां हो पाप्यानो, मरतां ? कां आश्रया धिक्कारिता ? येशू दीनांचा तारिता, या,तरा, तो उध्दरीता ... 3 जिवाला त्यानें अर्पिलें; कुशीं हो क्लेश भोगिले; पाप्यांचा दंड भरुनी रक्तें दिली तो खंडणी .... 4 - -- H Balentine