मराठी
244 आपल्या गरजा प्रभूला सांगणें
अहो कष्टी प्राणी प्रभूकडे जा,
तयाला सर्व सांगा गरजा;
पाहा त्याकडे तो शांती पुरवी,
सुभावा ठेवा, तुम्हां वांचवी ... 1
प्रभूकडे जा हो, तो शांति पुरवी,
प्रभूकडे जा हो, तो तुम्हां वळवी,
प्रभूकडे जा हो, प्रभूकडे जा हो;
प्रभूकडे जा हो, तो शांति पुरवी ध्रु
तुमची असंख्य पापें उठती,
कीं पर्वतासमान दिसतीं,
ज्याने प्राण दिला त्याला विनवा,
होऊनि नम्र क्षमा मिळवा ... 2
तुमची ती भीती प्रभू दुरावी,
अश्रूही ममतेनें तो पुशी,
धरुनी हातीं घेईल जवळी,
विश्रांती तो देईल सगळी ... 3
--- मेरी ई. बिसल