245 प्रभुद्वारे मनाची शुचि

मराठी

245 प्रभुद्वारे मनाची शुचि पतिता ये चल शुचि व्हायाला, प्रभुयेशूपदास धरी; अधसिंधुमधुनी तरायाला प्रभूयेशूकृपाच तरी ... 1 प्रभूच्या ... प्रभूच्या ... प्रभूच्या धर वंद्य पदा; जगदुद्धारक गुरुराजाच्या न दुजा पथ मुक्तिपदा ... ध्रु प्रभू येशू क्षितीवरी आला या, बघ तोचि समर्थ सखा, अघपाशा झडकरी तोडाया; तुज देईल नित्य सुखा ... 2 म्हणवी तो पतितसखा, देई अधमुक्ती विनम्र जनां, म्हणुनी तूं शरण तया जाई; प्रभू देईल शांति मना ... 3 मनुजांच्या हरी अवघ्या तापा, प्रणती करुणा करी तो प्रभुपाशी चल त्यजुनी पापा, शरणागततारक तो ... 4 --- पंडिता रमाबाई