मराठी
246 ख्रिस्ताला शरण जाणें
पातक्यांनो भ्रष्ट,
हो दुष्कर्मी नष्ट,
ख्रिस्त प्रभू श्रेष्ठ,
तारी तुम्हां
आहे शक्तिमंत,
मोठा दयावंत,
क्लेशीं जे अत्यंत
त्या उद्धरी ... 1
तोचि स्वर्गवासी
सूर्यवत प्रकाशी
तारण्या जनासी
खाली आला;
देह धरुनियां
दु:खे सोसूनीयां
प्राण अर्पूनीया
दंड दिला ... 2
वधस्तंभी गेला,
पाप्यानसाठी मेला,
हेतू सिद्धी नेला
तारण्याचा;
झाला हो जिवंत,
ठरे भगवंत
गाजवूं अत्यंत,
प्रेमा त्याचा ... 3
त्याजपाशी यावे,
पाप पत्करावे
मान्य त्यास व्हावे;
घ्या उद्धार;
तो तुम्हाला घेई
दिव्य सौख्य देई.
अंती तोचि नेई
वर्ते पार ... 4
--- H Balentine