मराठी
247 सत्यशोधन
तूं जा तरुणपणी
सत्याचा शोध कर,
आमोल्य तें मानुनी
मिळेल
तेव्हां धर;
मनांत ठसवावे,
करी न अनमान,
विषय नाकारावे
कां तेणें बुडे ज्ञान ... 1
या वेळीं शक्ति मोठी,
मनास हर्ष फार,
पुढें सुखें हि खोटीं
नाही आवडणार;
म्हणून तूं झटूनी
शोधूनि सत्य घे,
द्रव्यास दे टाकुनी,
जगाही अवघे ... 2
अतांच सत्य घ्यावें,
करिशी कां उशीर !
कधीं न जाऊ द्यावें,
सुमार्गि चाल स्थिर;
अतां तरुणपणी
सत्याचा शोध कर,
ईश्वर सत्यखानी,
सप्रेम यास स्मर ... 3
-- H Balentine