मराठी
248 पीडितांस आश्वासन
कष्टी श्रमी भागलेल्या
दीन मानवा,
ख्रिस्तद्वारे मिळे तुला
विसांवा ... 1
कैसा मी ओळखू त्यासी
शरण जाया ?
हातीं, पायी, कुशीं पाही
खुणा त्या ... 2
आहे मस्तकीं मुगुट
शोभा द्यावया ?
काटयांचा मिळाला मात्र
घालाया ... 3
मी सोडिलें नाही त्यासी,
काय शेवटीं ?
कष्ट जातां सदा होई
विश्रांती ... 4
मज शरणागताला
तो धिकारणार ?
ऐसें नाहींच कल्पांती
घडणार ... 5
अंती तीं सतसौख्ये खरी
ख्रिस्त देई काय ?
देई तारलेले गाती
जयजय ... 6
-- मेरी ई. बिसल