मराठी
249 ख्रिस्ती मनुष्याचा अनुभव
येशूपाशी येई मी
तोच देई पूर्णोद्धार
भ्रष्ट मी असा श्रमी,
वाही तोच दंडभार ... 1
धरीं भाव अंतरी,
येशू पुत्र ईश्वरी,
सदा तोच उद्धरी,
टेंके मी तयावरी ... 2
पापओझीं काढी तो,
चित्तीं शांति भरी तो,
शुद्ध पुर्ण राखी तो,
सौख्यस्थानी नेई तो ... 3
येशुपाशी येई मी
तोच देई पूर्णोद्धार,
भ्रष्ट मी असा श्रमी,
वाही तोच दंडभार ... 4
---- मेरी इ. बिसल