250 हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत

मराठी

250 हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत निर्भय सुखींचं बैसली वाड्यांत मेंढरे, तीं नव्याणवच दिसली हरपले एक रे ! तें राहिलें रानी हिंडाया, मेंढपाळ नाहीं कोणी त्या ... 1 हें मेंढपाळ पाहुनी उगाच राहीना, म्हणे, मला त्यावांचूनि बरेच वाटेना ; जाईन रानीं शोधाया त्या हरपलेल्या आणाया ... 2 तत्काळ त्या रात्रि मेंढपाळ पहाया चालला, तो डोह नद्याही विक्राळ शोधीत फिरला; त्या दीनाचे स्वर ऐकिले तें होतें मरायास टेंकले ... 3 त्या मेंढपाळें जे दु:ख हाल त्या रात्रिं सोशिले, कांटयांनी होई तो घायाळ, कुणा न तें कळे; रक्ताने पाय भरले, हातांतही व्रण दीसले ... 4 तें मेंढरू जै पाहिले तैं होई हर्ष फार, उचलुनी त्यास घेतिलें, केला जयजयकार; दूतांनी स्वर्गि ऐकिलें, तयांनी सहर्ष गाईले ! ... 5 -- मेरी. इ. बिसल