मराठी
251 ख्रिस्ताचें आमंत्रण
कष्टी, श्रमी व खंगले,
पापाने लादलेले, या;
मी दु:ख वारीं सगळे,
देतों सछांति हृदया ... 1
जे मजपाशीं शिकती
मनांत होती नम्र, दीन,
शांति तयांस मिळती,
कां कीं मनीं मी नम्र लीन ... 2
माझ्या जुवास घेउनी
वाहील जो खांद्यावरी,
तो दंडभीती टाळुनी
पावे विश्रांती अंतरीं ... 3
प्रभू अम्हीहि येउनी
अनन्य भाव ठेवितो,
तुला जीवात्मे सोपूनी
उद्धार मात्र मागतों ... 4
--- H Balntine