मराठी
252 येशूचें मोलवान नाम
दु:खी कष्टवान बाळा,
येशूनाम घे त्वरें,
देई सौख्य, घोर तुला,
घे तें सर्व ठायिं रे ... 1
मूल्य नाम, गोड तें !
देई आशा सर्वा तें;
मूल्य नाम गोड तें !
हर्ष स्वर्गाला देतें ... ध्रु
ढाळितुल्य रक्षण्याला
येशूनाम घे सदा
मोहपाश वारण्याला
चित्तीं निर्मला सदा ... 2
आम्हां येशूप्रीती हातीं
घे तैं गाई रसना;
आहा, येशूनाम किती
हर्षस्फुर्ति दे मना ! ... 3
--ऐस .बी . फेअरबँक