253 जीवनदायी उदक

मराठी

253 जीवनदायी उदक जीवनी उदक येशू देई, फुकटवारी देई, जीवनी उदक पिऊ देई सकल प्रिय भक्तांसी; तें झऱ्याचें पाणि घ्या पिउनि, फुकटवारी देई, तें झऱ्याचे पाणि घ्या पिउनि, देई, तृषितांसी देई ... 1 आत्मा व नवरी म्हणती, ये, फुकटवारी घ्यावें तृषित असशी तरच ये, व जीवनी उदक प्यावें ; उपळतें जिवन वाहे, वाहे फार वाहे, तुला व मला तें मिळे ... 1 स्वर्गिय सदन येशू देई, फुकटवारी देई, स्वर्गिय सदनीं वस्ती देई सकल प्रिय भक्तांसी; अनंत वतन रोषनाई, फुकटवारी देई, अनंत वतन रोषनाई, अपुल्या प्रिय भक्तांसी ... 2 सुंदर मुगुट येशू देई, फुकटवारी देई, सुंदर मुगुट घालू देई, सकल प्रिय भक्तांसी; धवल वसन येशू देई, फुकटवारी देई, धवल वसन लेउ देई, अपुल्या प्रिय जनांसी ... 3 अनंत दिवस येशू देई, फुकटवारी देई, अनंत दिवस राहू देई सकल प्रिय भक्तांसी; आनंद पुरता येशू देई, फुकटवारी देई, आनंद सतत भोगू देई आपुल्या प्रिय भक्तांसी ... 4 --- ऐस .बी . फेअरबँक