254 दारीं उभा असलेला ख्रिस्त

मराठी

254 दारीं उभा असलेला ख्रिस्त प्रभू आला आतां तुज बोलवाया, ठोके दाराशीं हृदयाचे. न मिळे तैसा तुला सुमित्र व्हाया, दूर कां त्यासी लावायाचें ? ... 1 ठोकितो, ठोकितो, प्रेमें बोलावितो प्रभूच दाराशीं हृदयाचे. ठोकितो, ठोकितो, वाटही पाहतो, दाराशीं राहतो हृदयाचे ... ध्रु प्रभू आला कृपा पूर्ण करावया, त्याची वाणी ऐकुनी स्वीकार; खंडि तुजला पुर्ण मुक्ती द्यावया, भाव ठेवुनी घे हा उद्धार ... 2 प्रभू आला आतां तुज बोलवाया, तो मनीं किती हर्ष देणार ! भेट तुझी येई किती प्रेमें घ्याया, तो कृपा द्याया कैसा उदार ! ... 3 तो उभाच आतां प्रेम दाखवितो, या क्षणीं धरीं तो सदाश्रय, स्वर्गसौख्य तो निजभक्तांना देतो, देइ तुलाही तैसें अक्षय ... 4 --- मेरी ई. बिसल _________________________________________________________________________________ 255 दारीं उभा असलेला ख्रिस्त दाराशीं पाहा कोण तो उभा असुनी ठोकितो, कृपाळू मित्र असतां तुम्ही दुर्लक्ष करितां ... 1 ख्रिस्त प्रभूला हृदयी घ्या तें शुद्ध ठेवाया, कां करितां दूर दाराबाहेर ? त्या प्रियास हृदयी घ्या ... ध्रु कृपा अतांहि द्यावया तो पाहतो हृदीं याया, कुणीहि प्रीति असली वैऱ्यानंवरी न दाविली ... 2 खरा सुमित्र आहे काय ? करील सर्वदा सहाय ? प्रभू त्या खांबी खिळीला तैं पाप्या मित्र ठरला ... 3 तो दिव्य मित्र यावया, त्याचा प्रसाद पावाया टाकुनी पाप सगळें कराच दार मोकळें ... 4 न त्यास आंत घेतलें, देऊनि खेद लाविलें, न जाणों तो तुम्हां सोडील कृपेचि वेळही टळेल ... 5 -- मेरी ई. बिसल