मराठी
256 ख्रिस्ताचे आमंत्रण
येशू खांबी टांगला,
क्लेशें फार पिडीला,
दावी तैं तरी प्रेमा,
माणसां करी क्षमा;
सर्व नष्ट पापियां,
या, म्हणे, कृपा घ्याया ... 1
मीं तुम्हांसी खंडिलें,
मोल पूर्ण दिधलें,
बंदीमाजीं राहतां,
कां हो दंड साहतां ?
या नमा, पडा पायां,
या, म्हणे, कृपा घ्याया ... 2
या, पिता बोलावितों,
मोठी प्रीती दावितों,
आत्मपूत्र मानितो,
सन्निधींच ठेवितो,
मान द्या तुम्ही तया;
या, म्हणे कृपा,घ्याया ... 3
मृत्यू देतसे भया
देई तैं मी आश्रया,
स्वर्गलोकीं नेऊनि
ठेवी दिव्य सदनी
तैं म्हणेन, सर्व या,
या प्रीतीत घ्यावया ... 4
---- H Balentine