मराठी
257. प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू
सर्वकाळ मृत्युदंड योग्य नारकी
मी असें, अशा कधीं न देव उद्धरी;
धैर्यहीन मी निराश घोर पातकी,
भीती हि मनांत फार सर्वादां धरीं ... 1
प्रीतीपुर्ण दीनबंधु येशु भेटला
उध्दरीन मी तुला म्हणून बोलला;
तारी तो मला, तारी तो मला
मी स्तवीन नित्य तया, तारी तो मला ...ध्रु
गोड शब्द जे स्वतांच येशु बोलला
मी कदापि टाकणार नाहीं पापियां
ऐकतांचि तें मनांत हर्ष दाटला.
मीं धरुनी धीर जीव अर्पिला तया ... 2
पापभार, रोग, शोक सर्व वाहिले,
मृत्यूभीती आणि दंड हे निवारिले
येशूनें; मनांत दुःख नाहीं राहिले
पामरा मला स्वकीय त्यानें तारिलें... 3
येशुनें मला स्वकीय रक्त ओतुनी,
संस्करुनि जी नवीन वाट दाविली,
तींत चालण्यास आत्मशक्ती देउनी
मांझीया हृदीं अपार प्रीती लाविली ... 4
----- पंडिता रमाबाई