258 ईश्वराची प्रसन्नता

मराठी

258 ईश्वराची प्रसन्नता स्वतां ईश्वर म्हणतो; मी स्वर्गलोकीं राहतों, पवित्र देव परात्पर, अनाद्दनंत, विश्वम्भर ... 1 तरी येऊनि जगती मी राहें जनासंगती जो, नम्र, लीन, दैन्यवान त्या ठायीं माझें प्रियस्थान ...2 दिनांला देतों जीवना, खिन्न पाप्याना सांत्वना, जयाचें फुटले हृदय तयांचा होतों मी आश्रय ...3 हे देवा, तूं कृपाळू फार सर्व प्रसंगी हो आधार; आम्हाला तुझे लोक मान, तरी होईल समाधान ...4 ------ H Balentine