मराठी
259 ख्रिस्तरक्तानें होणारी शुद्धि
येशूच्या रक्तें भरलें
धुण्याचें कुंड जाण,
जे पापी त्यांत घातले
ते होती शुद्ध प्राण ... 1
तो खांबी मरणारा चोर
त्यामुळें हर्षला,
तेणेंचि माझा दोष घोर
पुसेल सगळा ... 2
हे प्रभू तुझें रक्तमोल
कधी न संपणार,
देवाचें सर्व प्रिय कूळ
तूं तेणें खंडणार ... 3
हा रक्तओघ वाहतां
मीं भावें पाहिला
तेथुनि स्तुती करुनी
उद्धार गाईला ... 4
मी ह्या जगांत राहतां
करीन स्तवनें,
व प्राण अंती सोडितां
अनंत गायनें ... 5
------- H Balentine