261 ईश्वरेच्छेनुरुप वर्तन करण्याची उत्कंठा

मराठी

261 ईश्वरेच्छेनुरुप वर्तन करण्याची उत्कंठा देई असें वरदान, दयाळा, कि जन्मभरी मीं तुझें असावें बालक रम्य, लहान ... ध्रु ज्यांत तुझा हो मान, दयाळा, जें तुला रुचे तें करावयाची दे इच्छा, दे ज्ञान ; तूं , ईश्वर माझा, माझी तूं सद्गती, ही सदा लोभली तवचरणीं मन्मती, ताव आत्मा नेइल तिकडे ही धांवती ! प्रतिनीतीचें स्थान, दयाळा, ताव आत्मा देवो जवळ करोनि मजला सौख्यनिधान ... 1 प्रेमा नच परिमाण तुझ्या त्या, तो प्रेमा तव वा मम आत्म्याचा अवघा आश्रय जाण ! ही प्रीती तुझी मम आत्म्याची जागृती, तव न्याय तयाची नियती कीं संमती. किती प्रेमदयेची सांगड मधू दिसती ! मजला करिती समान, निरंतर ही अधिकाधिक मज जवळ ओढिती ; धन्य तुझेंच विधान ! ... 2 आतां हेंच प्रमाण, दयाळा कीं माझें, जेथें तुझीं पाउलें तेथें वसतिस्थान; मज मी ची झाली तुझ्यापुढें विस्मृती तरि जन्मून झाली मज मोठी प्राप्ती ती ताव इच्छित करणें हीच मन:प्रकृती ! दु:खाचें अतिमान, दयाळा, मज वाटो करणें चुकूनही तव आत्म्याचा अवमान ... 3 सुधारसाची खाण, दयाळा, मज गमो लाघली, प्रसन्न तव तें बघतां हृदयिं ध्यान ! तूं शांती, दयाळा, माझी येथें, तिथें ! जें तुजमजमध्यें कोण तया हारितें ? हो हर्षित पाहून माझ्या अनुतप्ते , हर्षच अपुला मान मला तूं , जरी असें न, तरि मम शीर्षाखाली खेदाचे उपधान ! ... 4 --- ना. वा. टिळक