262 ख्रिस्ती मनुष्याची स्वाभाविक दुर्बलता

मराठी

262 ख्रिस्ती मनुष्याची स्वाभाविक दुर्बलता घ्यावें तुला सतत पातकनाशना मीं, व्हावें खरें, प्रभूवरा, तव मार्गगामी, इच्छा मदीय परिपूर्ण करावया ही नाहींच शक्ती मजला प्रभुराय, नाहीं ... 1 मी दास पूर्ण मम मानसकामनांचा, सांचाच दुष्टपण,गर्वितता ययांचा ; यदबन्ध तोडीन म्हणे, परी हें करूं ही, नाहींच शक्ती मजला, प्रभुराय, नाहीं ... 2 मी तारका, भयद पातकभारचूर्ण, त्राता मला तुजविना दिसतो कुणी न ; ये तार ! हांक फिरुनी तुज मारण्याही नाहींच शक्ती मजला, प्रभुराय, नाहीं ... 3 एका क्षणांत सृजण्या नवसृष्टीगोल, या नाशनया सकल विश्वही हें सलील तूं शक्त ! तूंच जरि बोलशी बोल एक दिव्यत्व येईल मला मनुजास देख ! ... 4 ---- शा. द. उजगरे