272 ख्रिस्तसहवासाची महती

मराठी

272 ख्रिस्तसहवासाची महती काय करायाचें ! जगाशीं काय करायाचें ? ... ध्रु होईल जें जें, ख्रिस्तार्पण तें बोल बोल वाचे, सदा तूं बोल बोल वाचे ! बोल बोल वाचे ! जगाशीं ... 1 निंदो वंदो तुज कोणी, ताव त्यांत काय वेचें ? मना रे, त्यांत काय वेचें ! त्यांत काय वेचें ? जगाशीं ... 2 काम तुझें प्रभू येशूमागून नित्य चालण्याचें, मन्मना नित्य चालण्याचें, नित्य चालण्याचें, जगाशीं ... 3 ख्रिस्तासंगे हित साधी तूं शत्रुमित्र यांचें, सदाचें शत्रुमित्र यांचें, शत्रुमित्र यांचें, जगाशीं ... 4 अशाश्वताला नाच मज सोडून प्रभूला भजण्याचें, मन्मना, प्रभूला भजण्याचें, प्रभूला भजण्याचें, जगाशीं ... 5 प्रेमाचें प्रभू निधान लाधे निश्चल शांतीचें, तुला हें निश्चल शांतीचें, निश्चल शांतीचें ! जगाशीं ... 6 ----- ना. वा. टिळक