273 जगाची दृष्टी व देवाची दृष्टी

मराठी

273 जगाची दृष्टी व देवाची दृष्टी जगामध्यें आम्ही निर्लज्ज, निर्लज्ज, सैनिक हो सज्ज देवाजीचे ... 1 जगामध्यें आम्ही अज्ञान, अज्ञान, दिलें सर्व ज्ञान देवाहाती ... 2 जगामध्ये आम्ही बावळे, बावळे, चातुर्य सगळे देवापाशीं ... 3 जगामध्यें आम्ही भिकारी, भिकारी, सारी मातब्बरी देवापुढें ... 4 दास म्हणे काय करावा शहाणा ? जगाच्या तारणा वेडा व्हावा ! ... 5 ------- ना. वा. टिळक