274 सर्वोत्कृष्ट मेवा

मराठी

274 सर्वोत्कृष्ट मेवा प्रभुपदीं लागतसे बहू गोडी ... ध्रु मधुरसीं काहीं अशि रुची नाहीं चव तर पाहा थोडी ... 1 इहपरलोकीं उपमा द्याया दुसरी नाहीं जोडी ... 2 परी मनरसना निर्मल होऊनि दृढ विश्वासें ओढी ... 3 सतत पितां हि अक्षय लाभे अमरपणाची जोडी ... 4 ------ कृ. र. सांगळे