275 शांतीप्रीत्यर्थ प्रार्थना

मराठी

275 शांतीप्रीत्यर्थ प्रार्थना प्रभू दयाल, कोणी शांती करिल करिल करिल करिल ? ... ध्रु मी उदास खिन्न अती, शांति नसे, मंदमती; अश्रू पुसुनि कोण उरीं धरिल धरिल धरिल धरिल ? ... 1 स्त्रीमुलेंहि, आप्त , सखे देति मला दु:ख सुखें; हृदयिं कोण शांति खरी भरिल भरिल भरिल भरिल ? ... 2 भूमिगार मी स्वतास, ईश्वरा; जनास त्रास, हें नाम अघदु :ख कोण हरिल हरिल हरिल हरिल ? ... 3 येतसें तुलाचि शरण, दाविं, कृपासिंधू, चरण; तुजविण प्रतितास कोण वरिल वरिल वरिल वरिल ? ... 4 ------ कृ. र. सांगळे