276 शांतीसाठीं लागलेली उत्कंठा

मराठी

276 शांतीसाठीं लागलेली उत्कंठा प्रभू मज देई तुझी खरी शांति ... ध्रु जगशांतीने बहू मळमळतें, होत असे मज वांती ... 1 शांती अपुली दिली तूं ज्यांना, काय तयांच्या कांती ... 2 शांती दे, स्थिर कर मन माझें, काढ मनाची भ्रांती ... 3 ताव शांतीनें मज सुख वाटे; वर नेई ती अंतीं ... 4 ------ कृ. र. सांगळे