277 अक्षय जीवनाची तळमळ

मराठी

277 अक्षय जीवनाची तळमळ पाणी द्या पाणी, तृषित मी ... ध्रु नको कुव्याचें, नको नदीचें, आणिल जरि कोणी. तृषित ... 1 द्या ऐसें कीं तृषा न लागे पीतां जें फिरुनी. तृषित ... 2 सर्व जलाशय पाहुन आलों, श्रमलों मी भ्रमुनी. तृषित ... 3 जा, जा होईल प्रभू येशूच्या तृप्ति तुझी चरणीं. तृषित ... 4 अक्षय जीवन, कष्टविनोदन प्रभूवीण नच भुवनीं. तृषित ... 5 ------ ना. वा. टिळक