278 आध्यात्मिक शत्रु

मराठी

278 आध्यात्मिक शत्रु प्रभू मज, सोडूं नको भवरानीं ... ध्रु या भवरानीं बहू अंधेरी अंधहि मी नयनांनी ... 1 संसारीं ह्या अति दु:खें हीं झाडी किर्र, न पाणी ... 2 ताव भक्तीचा त्रास अरुचि हे कांटे मोडती गानी ... 3 वृश्चिक चिंता, भ्रम सर्पच हे करिती दंश बळांनी ... 4 षडिपु पाहा वृक, चुंबक हे चवतळती क्रूरवाणी ... 5 मनठकभिल्ले मजला केलें व्याकुळ तीव्र शरांनी ... 6 सैतानच तो सिंह जयाच्या येति आरोळ्या कानीं ... 7 ताव साह्ये मी जिंकिन यांना, मग मज ने सुस्थानीं ... 8 ताव हस्ता मी सोडूनि विविधा अपुल्या केल्या हानी ... 9 पश्चात्तापे शरण तुला मी, माझा क्रोध न मानीं ... 10 ------ कृ. र. सांगळे