मराठी
२८०. कुरकुर न करणें
नाहीं प्रभूला दोष मी लावायाचा हो,
ऐसा धिक्कारू काय मी प्रेमा त्याचा हो...ध्रु
धन,संतती, संपत्ती सर्व काहीं हो
होतें जयाचे तयानें नेलें पाहीं हो... १
किडे पडूनी चाळणी शरीराची हो
होवो, स्तुति मी गाईन ईश्वराची हो ...२
सर्व प्रियांनीं सोडिलें जरी आतां हो,
तरी मित्र तो जवळी शांतिदाता हो ...३
दोष किमपि तुजला लावायाला हो
जिव्हा कदापि न ढळो, हे कृपाला हो ...४
----------कृ .र.सांगळे