२८१. ख्रिस्तभक्ताचा आनंद

मराठी

२८१. ख्रिस्तभक्ताचा आनंद आनंदी आनंद ! सदोदित आनंदी आनंद !..ध्रु भृंग गुंततो सदैव सेवुनि ख्रिस्तकृपामकरंद ख्रिस्तकृपामकरंद सदोदित आनंदी आनंद !...१ स्वयें उचलील्या क्रुसें विभूषित नित्य आमुचे स्कंध, नित्य आमुचे स्कंध सदोदित आनंदी आनंद !...२ सर्वजय प्रभू येशू अमुची सत्ता निष्प्रतिबंध ! सत्ता निष्प्रतिबंध सदोदित आनंदी आनंद !...३ दूर दिसेना कुणा आमुच्या करांत सत्सुखकंद करांत सत्सुखकंद सदोदित आनंदी आनंद ...४ पहिल्यापासून पित्यास अमुच्या अमुचा अवघा छंद ! अमुचा अवघा छंद सदोदित आनंदी आनंद...५ ---------- ना. वा. टिळक