२८२. प्रभूसहवासाचा आनंद

मराठी

२८२. प्रभूसहवासाचा आनंद हा माझा आनंद ह्यापुढें, हा माझा आनंद ! हाच मनाला छंद ह्यापुढें, हा माझा आनंद !...ध्रु प्रभुचरणांबुजी प्रेमनाम मधू, दिव्य सदा मकरंद होऊन भृंगी सेविन, गाइन गुंजारव स्वच्छंद ...१ त्या सुरसाचा निधी सांठवीन करुनी यत्न आनंद, सेवून त्याला म्हणतील जन हे हाच खरा सुखकंद !...२ ------ ना. वा. टिळक