मराठी
२८३ प्रभुमुळे हर्ष
हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो,
माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो ... १
येशू तारितो हो, मला येशू तारितो,
यामुळेच माझा जीव बहू आनंदतो ... २
प्रेम दावितो हो, येशू प्रेम दावितो,
प्रेमानेच लहानथोरां तो बोलावितो ... ३
प्रिय वाटतो हो, येशू, प्रिय वाटतो,
माझें तन, मन, धन, त्यास अर्पितो ... ४
------ मालतीबाई केसकर