ख्रिस्त माझा आनंद

मराठी

२८४ ख्रिस्त माझा आनंद ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद ... १ मूळ रोगाचें निदान आज केलें ख्रिस्ते, जाण ... २ ख्रिस्त हाचि सदुपाय, धरीं त्याचेच मी पाय ... ३ ख्रिस्ते मारिलें मरण, केलें माझें संरक्षण ... ४ अविनाशी ख्रिस्त नाव, तिजवरीमाझा भाव ... ५ दास म्हणे, हो आनंद ख्रिस्त माझा सुखकंद ... ६ --------सि. मिसळ