निरंतरचा आनंद

मराठी

२८५ निरंतरचा आनंद हसें ! निरंतर हसें आमुच्या वदनी हृदयी हसें ... ध्रु हर्ष आमुचा हरित ऐसा जगांत ऐसा कोणी नसे ... १ नसे काळजी क्षणैक होईल उद्यां आमुचें कसें ... २ मंगलमय सुस्वदु:ख, पित्याचें प्रेमळ करयुग जसे ! ... ३ उभें आंगणीं, उभें पुढे गृह अमुचें आम्हा दिसे ... ४ प्रभू मृत्युंजय जीवन अमुचें व्यापून आम्हा वसें ... ५ मीपण वाहून प्रभूला सुटलें असेंच तें तें पिसें ! ... ६ -------- ना. वा. टिळक