मराठी
२८७ ख्रिस्ताची अंतर्यामी वस्ती
होतों तैसा नाहीं, व्हावें तैसा नाहीं,
असली स्थिती हि माझी, बापा ... १
समाधान आणि तळमळ दोन्ही
रथास जुंपोनी निघालो मी ... २
माझा गुरु, माझा बांधव सारथी
प्रभू येशू भीती मला नाही ... ३
भीती हो कशाची ? आनंदी आनंद
सर्व सौख्यकंद हाती माझ्या ... ४
हातीं हो कशाचा हृदयी भरला,
जातो कुठे मला सोडूनि तो ? ... ५
दास म्हणे, आतां साराच पुढला
मार्ग सोपा झाला अनायास ... 6
----- ना. वा. टिळक