288 अखंड ख्रिस्तचिंतन

मराठी

288 अखंड ख्रिस्तचिंतन घरी, दारी, बाजारांत, किंवा राजदरबारात ... १ देह कोठे का जाईना, काज काहीं का करीना ... २ तुझें मनाला चिंतन असो माझ्या रात्रंदिन ... ३ यांत धर्म सारा आला, लाभ अवघा सांठविला ... ४ दास म्हणे, माझें काहीं दुजें मागणेंच नाहीं ... ५ ------------ ना. वा. टिळक