ख्रिस्तसंयोंग

मराठी

२८९ ख्रिस्तसंयोंग असा सदा संयोग असावा चंद्र चंद्रिका यांत जसा, प्रभो, आपला, मग मी याचिन दुसरें काहीं नच सहसा ... ध्रु पत्नीसम मी सदा धरावें प्रेमाच्या पाशांत तुला, कन्येसम सत्कार करावा, बहिणीसम तुझिया स्तुतीला अर्थ शब्द एकत्र राहुनी, शब्द सेवी अर्थास जसा, स्वामी, तुं मम, मी सेवक तव, सदा असो संबंध असा ... १ माझा आत्मा जसा आरसा पाहो जन त्यामाजी तुला, रहा विचारीं, मम उच्चारी, आचारीं तूं रम, विमला; ख्रिस्ता ! ख्रिस्ता ! प्राण कुडीचा हो माझा तूं नित्य तसा, विरह आपला क्षणार्ध होतां होवो माझा जीव पिसा ... २ --------- ना. वा. टिळक