ख्रिस्ताचें व भक्तांचें नातें

मराठी

२९१ ख्रिस्ताचें व भक्तांचें नातें तूं वस्तू , तुझी छाया; तूं आत्मा, देह मी, हे नातें सदा राहो, मग नाहीं मज कमी; पुढतीं तूं तुझ्यामागें टाकीन मी पावलें, ह्यामाजीं मला, ख्रिस्ता, सुख सारें पावलें ... १ ------- ना. वा. टिळक