मराठी
२९२ प्रभुसंयोग
एक प्रभूचा संग सुखकर ... ध्रु
संगें प्रभूच्या हृदया
सुचती विमल प्रीतीचे रंग ... १
प्रभूसंगाला शिवती न केव्हां
वियोग आशाभंग ... २
ख्रिस्तपदांबुज अक्षय रसयुत
मन्मन हो इह भृंग ... ३
काय जगी ? तत्समागमी तीं
सर्व सुखें हो दंग ... 4
----- ना. वा. टिळक