मराठी
२९३ ख्रिस्तविरहाची असह्यता
तुज सोडूनि, ख्रिस्ता, जाऊ कुठें? ... ध्रु
विरह तुझा रे नरक भयंकर,
भासे प्रलयानंल पेटे ... १
धर्मरवी तूं क्षणभर नसतां
मम हृत्कोशी तम् दाटे ... २
तुजवांचुनिया मार्ग जगीं ह्या
मज दिसती तितुके खोटे ... ३
पापी खटनट मी,
मज माझे तुजविण भारी भय वाटे ...४
उलटें मन्मन तुजविण दुसरा
कोण जगीं ह्या करी सुलटें ? ... ५
मम जीवन तूं, जगदुद्धारा,
मेलोंसें तुजविण वाटे ... ६
सहवासाहून तुझ्या मला रे
स्वर्गाचें सुख नच मोठें ... 7
----- ना. वा. टिळक