मराठी
२९४ ख्रिस्ताचें अंतर्यामी वास्तव्य
प्रभुराया, सेवक शरण पदीं, सदया,
पत्तीतजनोध्दरणा ... ध्रु
देव सुता परनिरता अघविरता विषयविकारातीता
सकलनुता सकलहिता मुक्तिपथा बहुसुमता,
उठता, बसता , वदतां, कृती करितां,
भजन तुझें मज, ताता,
भावें व्हावे सतत मज तुझे दिसूत चरण ... १
नयविमला, अतिसरला प्रेमबला विनमज्जनप्रतिपाला,
शमितखळा अमितबला, घृत्सकला, विगततुला,
श्रमला, भ्रमला, तव सेवक रमला, तव चरणी हा घाला;
ख्रिस्ता होवो हृदय मम तुझें रुचिर सदन ! ...२
----- ना. वा. टिळक
______________________________________________________________________
२९५ प्रभूसेवेचा लाभ
धनास मागूं तरी ते विनाशी,
ख्रिस्ता, धने भ्रंशविती मनाशी
सुखें धनाने मिळतात ऐसें
जें बोलती तें नच सत्य भासे ... १
कालावलंबी जरी कीर्ती आहे
तरी विनाशावीण केवीं राहे ?
नको मला कीर्ती तुलाच राहो,
दे सेवनाचा तव पाय लाहो ... २
--- ----- ना. वा. टिळक