मराठी
२९७ देवसहवास हाच स्वर्ग
बापा, करुणाकरा ईश्वरा,
खरेंच का तूं स्वर्गी रमशी
त्यजून इथें लेकरा ? ... ध्रु
स्वर्ग आणखी धरा, ईश्वरा,
खरेंच का हीं, भिन्न निरंतर
परकीं इतरेतरां ? ... १
क्षमस्व मज पामरा, ईश्वरा,
रमे कोणता दूर सोडूनि
बाप लेकरा खरा ? ...२
करांत धरुनी करा, ईश्वरा,
जवळ उभा तूं कुठें, कुठें रे,
कुठें स्वर्ग दुसरा ? ... ३
खरा, खरा, मी खरा, ईश्वरा,
स्वर्गसुखाचा भोक्ता मज तव
अंकाचा आसरा ... ४
--- ----- ना. वा. टिळक