मराठी
२९८ ख्रिस्त माझा उध्दारक
ख्रिस्त माझा तारणार,
मला वाटे प्रिया फार ... १
ज्या त्या वेळीं होतें दु:ख
करितां धांवा देतो सुख ... २
किती नम्र प्रभू झाला
पापी जग तारायाला ... ३
मातेपरी देतो धीर
म्हणे, आतां तरी फिर ... ४
काय सांगू त्याचें प्रेम,
देई वारंवार क्षेम ... ५
--- कृ. र. सांगळे