ख्रिस्ताश्रय कधी न सोडणे

मराठी

२९९ ख्रिस्ताश्रय कधी न सोडणे प्रिय प्रभू ख्रिस्ता, कैसा मी तुला सोडू ...ध्रु मजसाठी तू स्वजीव अर्पिला, आतां कां मी ऐशी प्रीती तोडू ? ...१ अतुल सुखाचे अनुभव देशी, वार पवित्र हा कसा झोडु ? ...२ जग, मन कपटी, सैतान वैरी, यांची हत्यारें मी कशी मोडूं ? ...३ खल सैतानें फसविलें मजला, पुन्हा त्यांशी मैत्री काय जोडूं ? ... ४ अनुताप योग्य होई न माते, कठीण या हृदया कैसें फोडूं ?... ५ उन्मद पापी, कृतघ्न खरा मी, नको नको माझें नांव खोडू ... ६ मृत्युदरीतून पार कराया अन्य मित्र ऐसा कोण जोडूं ? ... ७ तुजविण माझा निभाव न होई, पदर कोणाचा, सांग ओढू ? ... ८ ------ कृ. र. सांगळे .