मराठी
३०० येशूचे अगणित उपकार
येशूनाम हें अति आवडे,
मज होतसे अबु सुखानंद ... ध्रु
प्रभुपायी मी रिक्त होउनि
वाट पाहतो तयाकडुनि,
कधीं त्याच्या ओघें भरुनी
होई पूर्ण हृदीं सदानंद ... १
किती प्रेम त्यांचे मजवरी
लाखों पातकें माझीं तो हरी,
शुद्धात्मा देई अंतरी,
मग लावितो अति त्याचा छंद ... २
परी विश्वासाच्या द्वाराने
भरी मला पवित्रआत्म्याने,
करी पूर्ण त्याच्या प्रीतीनें,
हृद्यद्वार हो मग, दुष्टा, बंद ...३
क्लेशीं, संकटीं हातीं धरितो,
मार्ग परीक्षेमाजी काढितो,
अघांपासूनि मज राखितो,
यास्तव, जीवा, त्यातें वंद ... ४
अति हर्षे त्याच्या उराशीं
टेकुनिया जाई मी स्वर्गाशी,
मग पाहीन येशू प्रकाशी,
काय वर्णू मी तो प्रेमानंद ... ५
----- सु. वि. करमरकर