ईशदासांचा अधिकार

मराठी

३०८ ईशदासांचा अधिकार काळ बदलला काळ बदलला खुशाल बदलो तो परता पिता परात्पर ज्याचा त्याची काळावरतीही सत्ता ... १ दैव उलटलें दैव उलटलें खुशाल उलटो तें परतें, पिता परात्पर ज्याचा त्याच्या मुठींत दैवाची चरितें ... २ आकाशींची कुऱ्हाड आली कुऱ्हाड आली येऊ द्या पिता परात्पर ज्याचा त्याला खेळाया होइल सध्या ... ३ शत्रू गराडा घालून बसले, बसोत त्यांना कोण पुसे पिता परात्पर ज्याचा त्याहून पर्वतशतही धीर नसे ... ४ आधिव्याधी उभे पुढें, हें जरामरण पाठीमागें पिता परात्पर ज्याचा त्याशीं शक्त न हें लढण्याजोगें ... ५ सदा यशस्वी, सदा सबल तो सदा सुखी ह्या महीवरी, पिता परात्पर ज्याचा तो नर मनुषता दुसरीच वरी ... ६ जय जय येशू ख्रिस्ता जय जय युक्त तुझ्याशीं जो त्याचा पिता परात्पर तुझी तयाची एकच मग तनमनवाचा ... ७ --- ना. वा. टिळक