श्रद्धायुक्त प्रार्थना

मराठी

३१२ श्रद्धायुक्त प्रार्थना श्रद्धालू मानव सत्य पावतील जें जें मागतील देवपदीं ... १ जें जें शोधितील तें तें त्यां मिळेल, त्यांस उघडेल स्वर्गद्वार ... २ कोण असा जण देईनाची अन्न क्षुधित नंदन मागताहि ? ... ३ भाकर मागतां देईल पाषाण असा पिता कोण आहे जगिं ? ... ४ स्वभावें निष्ठुर मानव असती, तरी ते जाणती पितृधर्म ... ५ आपुल्या लेकरा देती ते पदार्थ वाटती यथार्थ तयाला जें ... 6 कैसा न देईल दिव्य स्वर्गराणा उत्तमची दानां निजबाळा? ... ७ ----- ग. र. नवलकर