प्रार्थेनेकरिता निमंत्रण

मराठी

३१५ प्रार्थेनेकरिता निमंत्रण चला चला चला सारे, एकवार जाउं या रे ... १ देवबापाचिया पायिं, तिथें भेदभाव नाहीं ... २ तिथें सारे माझें तुझें अस्त पावें, नको जें जें ... ३ तिथे नित्य रम्य एकी, नाव जिचें नको लोकीं ... ४ तिथें फिटेल संदेह सर्व उह, सर्व मोह ... ५ दास म्हणे, शुद्ध प्रेम एवढाच तेथें धर्म ... 6 --- ना. वा. टिळक _____________________________________________________________________________ ३१६ देवाला प्रिय अशी प्रार्थना ऐशी विनंती जरी थोडी, प्रभूला प्रेमाची गोडी ... ध्रु अलंकारिक शब्द विनंतित, वाणी शुद्ध नसो कीं, चिंता नाही प्रभूला त्याची, प्रेमाचा परी शोकी ... 1 बाहेरील शोभेची विनंती प्रभूला लगे धूर प्रेमभरित विश्वासें विनंति प्रभूला फार मधुर ... २ विश्वासाने सदबुद्धीने प्रभूला हृदंत सांगे त्यावरी सत्ता काही न करिता नम्रपणानें मागें ... ३ निर्मल अंत:करणं करोनि भाविक वृत्ती धरावी, बुद्धी धरुनीयां क्षमेची मग त्या प्रभूला विनती करावी ... ४ ---- कृ. र. सांगळे ___________________________________________________________________________ ३१७ प्रार्थेनेचे अगत्य प्रभूला प्रार्थित जा वारंवार ... ध्रु प्रभू हा दयाळू अति श्रेष्ठ राजा, द्यायास संतुष्ट फार ... १ मागाच म्हणजे लाभेल तुम्हा ठोकाच, उघडेल द्वार ... २ प्रिय पुत्र ज्याने दिधला तुम्हाला, आणखी न कां पुरविणार ? ... ३ आत्माही प्रभूचा शिकविलं तुम्हां, करूणस्वराने अपार ... ४ दिवशीं तुमची मध्यस्थी करितो, प्रिय ख्रिस्त हा तारणार ... ५ सद्भक्त यांसी आली प्रतीति, दिली उत्तरें फार फार ... ६ ---- कृ. र. सांगळे ___________________________________________________________________________ ३१८ प्रार्थना हे स्वर्गद्वार प्रार्थना द्वार स्वर्गाचें, प्रेमाचें जिवनाचे, दावील धाम सौख्याचें ... ध्रु प्रार्थनाद्वारे पुत्रपणाचें, जडेल नातें देवपित्याचें, मग वारस हो स्वर्गाचें ... १ अंकी पित्याच्या बसून लेकरे हितगुज वदती प्रार्थना द्वारे पारीहितार्थ नीट प्राणाचे ... २ ---- म. ल. गायकवाड