मराठी
३२१ ख्रिस्ती मनुष्याचें मार्गक्रमण
करीं, हे जिवा, निश्चय,
तूं स्थिर हो, त्यजीं भय,
धैर्य धरी नेट करीं,
सन्मार्गी धाव तू मारी ... १
अतक्रय विघ्ने सन्मार्गी,
धैर्य हजारों गाळीती,
देव नको जयां जगी
पुरी तयांची दुर्गती ... २
देव निधी सामर्थ्याचा,
संकट वारी नेहमी,
देव भरता मनुष्याचा,
देव महापराक्रमी ... ३
देवा, जगज्जीवन तूं ,
हो सकलांना पूर्णाधार,
तूं करिती सत्प्रेरणा
स्फुरण न कुणा येणार ? ... ४
गरुड वर्ते उडतो
तैसें अम्हीही चढुनी
स्वर्गगृहास पोहचूं ,
मुकुट घेऊं जिंकुनी .... ५
-------- एच. बॅलेएनटाईन
_________________________________________________________________________________
३२२. देवप्राप्तीमुळे हर्ष
येशूची सेवा आवडे,
गेलों सुवेळीं त्याकडे,
तो दावी फार करुणा,
माझ्यात तोष मावेना ... 1
धन्य वार ! धन्य वार ! ....ध्रु
जै सारा गेला पापभार,
सतत आतां प्रार्थना,
स्तुती आनंद सरेना,
धन्य वार ! धन्य वार !
प्रभूने ने केला जै उध्दार.
केला करार निश्चयें,
दिलीं प्रभूने अभयें,
अंदेशा कां आतां, जीवा ?
विसावा घे, जा गौरवा ..., 2
तो राहूं देई जवळीं
नित्याने तोचि सांभाळी,
सुखद स्वर्गी आणुनी
ठेवील तो स्वसदनी ....३
प्रेमळ माझा प्रभू तो
दास सुखी मी हर्षतो,
कां करूं घोर ? धन्य मी !
करीं उल्लास नेहमीं .... ४
-------- एच. बॅलेएनटाईन