मराठी
३२४ ख्रिस्तभक्ताचें कल्याण
माझ्या जिवा, करीं स्तुती,
तुझें केवढें कल्याण
ईश्वराची कृपा किती
तोचि तुझा बाप जाण ... १
ख्रिस्त तुझा तारणारा,
तुझ्यासाठी अर्पिला,
आत्मा प्रेरणा देणारा,
तुझ्याठायी राहीला ... 2
तुं धैर्याला धरूनियां
स्वर्गमार्गी सदा चाल,
प्रार्थनाहि अर्पुनीयां
स्थिर राहीं सर्वकाळ ... ३
ख्रिस्त तुला चालवुनी
तेथवरी पोंचवि,
कष्ट, हाल निवारुनी
सारी आशा पुरवी ... 4
-------- एच. बॅलेएनटाईन