अंतर्यामी वास्तव्य करण्यास ख्रिस्तास विनंती

मराठी

३२५ अंतर्यामी वास्तव्य करण्यास ख्रिस्तास विनंती प्रभू येशू प्रेमवंता, हें अपूर्व तुझें प्रेम, तारणार्या दयावंता, करिशी अनंत क्षेम, आतां दया दाखवुनी वस्ती अंतरी करीं, सर्व शत्रू घालवुनी, स्थान तू हृदि धरी ... १ तूं नको आम्हाला सोडू, राही सदा अंतरी, तुझी प्रीती नको तोडू, दे स्वच्छांती ईश्वरी, तुझ्या साह्ये चालताना गाऊ ते अपूर्व प्रेम, स्वर्गी पायां पडतांना वानूं तें अनंत क्षेम ... 2 -------- एच. बॅलेएनटाईन