मराठी
३२६ येशूची वाणी
येशूची वाणी ऐकिली,
'ये, कष्ट्या, निर्भयी,
माझ्या उराशीं टेंकूनी
घे शांती अक्षयी,
तेव्हा मी आलो त्याकडे
श्रमी, सुदुबळा,
शांतीचें स्थान सांपडे,
संतोष भरला ... १
येशूची वाणी ऐकिली
तान्हेल्या, ये, त्वरें,
जीवन घेई, पिउनि
होशी क्षमर्त्य रे,
तेव्हा मी आलो त्याकडे,
प्यालो यथेचछ जाण,
माझ्या आत्म्याला आवडे
मी झालो जीववान ... २
येशूची वाणी ऐकिली,
सूर्य जगाचा मी,
राहुनी माझयाजवळी
हो सुखी नेहमी,
तेव्हा मी आलों त्याकडे,
सूर्य खरोखरी !
तो तेज पाडी केवढें !
तेणें चढे वरीं ... 3
-------- एच. बॅलेएनटाईन