३२७. देवाच्या वचनाची स्थिरता

मराठी

३२७. देवाच्या वचनाची स्थिरता देवाचें सच्छास्त्र सदोदित स्थिर विश्वास ठेवाया हा पाया खंबीर; देवाच्या भक्तांनो, धरा पूर्ण भाव, वंदाहीं देवाचें सुवंदित नांव ... १ हे भक्ता, नको रे तूं बाळगू भय. कां घोर करावा ? तुझा तो आश्रय. तो देईल शक्ती, अनंत उदार, समर्थ कराचा देईल आधार ... २ पुरातूनी जातां तो साहय्य करी, पाण्यांत कदापि बुडूं न देई, समुद्रीं तो दावील कोरडी वाट, शब्दें शमवील सुसाटा व लाट ...३ अपुर्व क्लेशांत करी तो निमाव, अग्नीनें न पोळतां होई बचाव, तो काढील क्लेशें तुझे सर्व हीन तूं होशील निर्मळ सोनें अक्षिण ... ४ संपुर्ण जन्मात सद्भक्त सारे बापाचे हे भोगिती प्रेम खरें, तो वृद्धापकाळी करील सांभाळ, तो मातेहीपेक्षा अत्यंत मायाळ ... ६ जिवंत देवाचा जो पावेल आश्रय शत्रूचीयामध्ये तो राहे निर्भय. नर्काच्या शस्त्रास्त्रे न तो पडणार. न देव कल्पांती तया सोडणार ... 7 -------- एच. बॅलेएनटाईन